गझल
गझल
1 min
139
आले भरून डोळे मुखडा उदास झाला
बोलू कुणास आता जीवच भकास झाला
ठेऊन पावलावर पाऊल ठेवते ती
आनंद केवढा हा माझ्या मनास झाला.
जळणास सज्ज झाले लाकूड चंदनाचे
माझ्या कलेवराचा पेहराव खास झाला
राखेत वेढलेले तन आज नष्ट झाले
दुःखी जनास आता तितकाच भास झाला
घेतो कुशीत आता विसरून जात पाती
बेधुंद जीव माझा देवास आस झाला.
