STORYMIRROR

Shobha Wagle

Others

3  

Shobha Wagle

Others

गझल

गझल

1 min
234

गुन्हा सारखा का तू करतो..मूर्खपणा हा वाटतो

माफ करा मज म्हणत राहतो..मूर्खपणा हा वाटतो


शिक्षा असते चुकीला कसे ..कळले नाही तुम्हाला

सगळे करुनी मजेत हसतो..मूर्खपणा हा वाटतो


मना सारखे कुणा मिळेना.. सांगते तुला ऐक तू

दुःखात सुखी कुणीच नसतो..मूर्खपणा हा वाटतो


पोरांसाठी खस्ता खाई आई जीवनी पहावे

म्हातारपणी मुलगा वळतो..मूर्खपणा हा वाटतो


सुखात सगळे सगेच असती..जेथे तेथे पाहतो

कठीण काळी कुणीच नसतो..मूर्खपणा हा वाटतो


Rate this content
Log in