घरटे
घरटे
1 min
22
घरकुल प्रिय असे
आपापले प्रत्येकाला
पक्षी पण बांधताती
काड्या जोडूनी घरट्याला
घरट्यात विविधता
दिसे पहा बांधण्यात
काही काड्यांना जोडूनी
काही पाने शिवण्यात
फार सुबक घरटे
अति कामात निष्णात
असे सुगरण पक्षी
घरट्यास बांधण्यात
होता सांजवेळ पक्षी
धाव घेती कोटरीला
करीतात किलबिल
चिव चिवाट जोडीला
रहाण्यास प्राणी मात्र
शोधतसे तो निवारा
किती तऱ्हेची घरटी
पक्षी जमवी पसारा
