घरात सारे
घरात सारे
1 min
238
आनंदी आनंद गडे
आज आपण एकत्र गडे
सरकारच्या हुकुमामुळे
कोरोनाच्या त्रासामुळे.
आम्हाला शाळा नाही
बाबाना ऑफिस नाही
आईपण घरीच घरी
रोज नवे पदार्थ करी.
उशिरा उठणे झोपणे
सिरीयल मस्त पाहणे
खाणे पिणे मस्त राहणे
फक्त बाहेर न भटकणे.
खेळ खेळतो एकत्र
कामे ही करतो एकत्र
घरातली कामे शिकलो
ताण कामाचा जाणलो.
रोजच आमची भातुकली
आई बाबा मिळून भरली
नवे नवे रोज उपक्रम
एकानंतर एक असतो क्रम.
