STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

4  

Sanjana Kamat

Others

घे भरारी

घे भरारी

1 min
688

जगायचे होऊन मुक्त,

आकांक्षांचे पंख लावून.

स्वप्नझेप भरारी घेऊन,

बंधने सारे तोडुन.


माझा अस्तित्वाचा,

एक दिवस साजरा करीन.

घेत उंच उंच भरारी,

दुनिया ही करीन रोशन.


मोकळे आकाश,

अन तोकडे हात जरी असेल.

जिद्द व आत्मविश्वासाने पेटून उठेन.

साऱ्यांवर मात करून, मी पुढेच असेल.


भाग्यरेषा भाळावरची,

म्हणेल घे तू उंच भरारी.

ह्याच क्षणाची मी,

वाट पहात होते, रोज मी अंतरी.


सोडून दे मनातली भीती,

भीत्यापाठी दुनिया, हात धुवून लागते.

यश अपयशाचे सारून धुके,

लहरत,बहरत,आसमंतात भरारी घेते.


बोचणारी वाट ही काटेरी,

पाहून माझी चाल,ठेंगणे होईल आकाश.

चमकेन वीजेगत मी,

बनून, लख्ख लख्ख प्रकाश.


साहित्याला गुण द्या
लॉग इन