गडचिरोली शहीद
गडचिरोली शहीद
1 min
424
लाज कशी वाटली नाही
त्या नराधम माणसांना
हात कसा थांबला नाही
निष्पाप पोलिसांना मारतांना।।
देशसेवा करणे हा काही
ठरत नाही मुळीच गुन्हा
आणि असे जर समजाल
तर आम्ही करू तो पुन्हा पुन्हा।।
कोणताही पोलिस नाहीच
घाबरत आपल्या मरणाला
फ़क्त मरण सत्कारणी लागो
योग्य देशसेवेच्या कारणाला।।
समोरासमोर झाला वार तर
दोन हात जरूर करता येतील
लढता लढता एक दोघांचे तरी
मुडदे वार करून पाडता येतील।।
निधडया छातीचे पोलिस आम्ही
कदापी भीत नाही मरायला
महाराष्ट्र पोलिस तयार आहे
असे वार झेलून लढायला।।
