गड किल्ले
गड किल्ले
महाराष्ट्र भूमी ही राजे शिवरायांची
शान ती शिवबांच्या गड किल्ल्यांची
आज काळाची गरज आहे ती मुलांना
शिवरायांचा इतिहास जाणून घेण्याची.
शिवाजी राजेंचा इतिहास जतन कराया
राजेंच्या गड किल्ल्यांचे संवर्धन करूया
राष्ट्रभावना जागृत करण्या गड किल्ल्यांची
पराक्रमी ऐतिहासिक कथा जाणून घेऊया.
महाराजांचे अनेक गड किल्ले विखुरलेत
साऱ्या महाराष्ट्र भूमीच्या काना कोपऱ्यात
प्रत्येक किल्ल्यामागे दडलंय शौर्य योध्याचे
पडताळुन पाहण्या चला जाऊ थेट किल्ल्यात.
सिंहगड, पुरंदर, रायगड, असे किल्ले
शिवबांचे, वैभव साऱ्या महाराष्ट्राचे भूषण
कर्तव्य अमुचे संवर्धन त्यांचे करण्याचे
काळाची गरज आहे आज त्यांचे रक्षण
जरी समुद्रात शिवस्मारक बांधणे महत्त्वाचे
तरी महाराष्ट्राचे वैभव गड किल्ले संरक्षणाचे
धडे देण्या पुढच्या पिढीला जतन करा किल्ले
इतिहास जाणून घेण्या किल्ल्यांनाच भेटण्याचे.
