गावाकडची सकाळ
गावाकडची सकाळ
1 min
468
शुभ सकाळ
दिली बाक कोंबड्याने
नाही घड्याळाची गरज
किलबिल कानी पक्ष्यांची
जाग येतेची सहज
कानी येती मंद सुर
ऐकावी सुरेल भुपाळी
वहानांचा नसे आवाज
होता, शुभ सकाळी
बैलांच्या गळ्यातील घंटेचा
रुळुझुळतो मधुर नाद
बळीराजा निघे शिवारी
देऊन सर्जाला साद
फुले फुलती अंगणी
परिसर होतो गंधित
सडा समार्जन रांगोळीने
आसमंत होते प्रफुल्लित
उष:काल गावाकडे
असाच असे सदाकाळ
गरज नुरते शब्दांची
वदण्या शुभ सकाळ
