गाव (हायकु)
गाव (हायकु)
1 min
11.5K
चंद्र लपला
आकाशी मित्र आला
सुर्योदय झाला १
किलबिलाट
नभी विहारे पक्षी
सुरेख नक्षी २
ओवी गाताना
माय दिसते माझी
सोबती आजी ३
पावा वाजतो
दारी कृष्ण मुरारी
दान मागतो ४
गावची माती
आठव होता तिचा
जडते प्रिती ५