गाऊ प्रितीचे गाणे
गाऊ प्रितीचे गाणे
1 min
174
गाऊ प्रितीचे गाणे सखे
दोघे मिळूनी संग ।
न्हाऊ प्रितीत ऐसे ज्याने
दुनिया होईल दंग ।।
येऊ दे कितीही संकटे
त्यावर संगतीने करूया मात ।
जिने मुश्किल होईल सखे
माझे गं तुझ्या विरहात ।।
आवडे ना कोणी तुझ्या वाचून
नयनी गेली गं तू साचून ।
बोलते जेंव्हा माझ्याशी तू
वाटे हर्ष साजरे करावे नाचून ।।
आहे खरंच तुझ्यात गुरुत्वाकर्षण
तो माझ्या मनाला तुझ्याकडे ओढतो ।
चल बंधून जाऊ त्या बंधनात सखे
जो आपल्याला एकत्र जोडतो ।।
