गारवा
गारवा

1 min

11.4K
पहाटेचा मंद वारा देई अंगी शहारा
उबदार शालीची आठवण करी गारवा
सळसळ पानाची वाऱ्याच्या तालावर
मज आठवण देई तो सुगंधी मारवा
शब्दांचा गारवा देई दिलासा मनाला
माणुसकीचा गारवा हवा गरिबाला
उबदार शालीची गरज ती गारव्याला
माया ममतेची साद हवी ती दीनाला