STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

4  

Sanjay Raghunath Sonawane

Others

एका प्रेमाचे सत्य

एका प्रेमाचे सत्य

1 min
183

फुकट प्रेम करणारे ह्या जगात लाखो दिसतील 

तुझ्या बिकट प्रसंगी हेच तोंड लपवत फिरतील 

खोटी स्तुतीसुमने सांगून तुझे मन वळवतील 

प्रेमाच्या जाळयात अडकवून तुला बंदिस्त करतील  


तुझ्या मनमोकळ्या स्वभावाचा ते वेगळाच अर्थ काढतील 

कामवासनेने धुंद होऊन तुझ्या आयुष्याची राखरांंगोळी करतील 

प्रेम करताना तुला ते काळीज म्हणणारे असतील 

प्रेमाचा अंत झाल्यावर तेच तुझा जीव घेतील  


प्रेमात फसविण्यासाठी ते अनेक उपाय योजतील 

तुझ्या आयुष्याचे नियोजन त्यांच्याकडे नसतील 

खरा संसार करणारे ह्या दुनियेत नाममात्र असतील 

खोट्या संसाराची स्वप्नं दाखवून विश्वासघात करतील 


खऱ्या आणि खोट्या प्रेमाचा अर्थ तुला अल्लड वयात कळलाच नाही 

वेळ निघून गेल्यावर तू पश्चाताप करताना दिसली 

अतिघाई करून तू आयुष्य उध्वस्त करून बसली


Rate this content
Log in