एक वाक्य पालकासाठी
एक वाक्य पालकासाठी
उठतो दररोज आम्ही सकाळी
तुमच्या हाकेला येतो धावून अवेळी
तरी मार का बर मिळे आम्हास?
तुझ्या हातचा गोडवा गेला कुठे?
हे लागेल वेळ समजण्यास
तरीही मी म्हणतो एक वाक्य पालकासाठी ।। १ ।।
या हायटेक युगात इतका का हायटेक झालात तुम्ही?
तुम्हास बाहेर काढायला सदा जागे असतो आम्ही
काय हो तुम्हाला कळत कस नाही
पोराचा नंबर आलेला पाहायचे सोडुन
सोशल मिडीया बंद का करीत नाही.
खरच खुप थकलो आत्ता
चेहऱ्यावर खोटे हसु देखील कंटाळले हे पाहता
म्हणुनच म्हणतो मी एक वाक्य पालकासाठी ।।२।।
जन्मलेल्या बाळाला बरोबर ,चुक
तुम्ही सांगायचे
त्याच्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्यायचे
त्याला बसवुन गप्प का जिज्ञासू त्यांची संपवता
भविष्यात काही अपयश आल्यास का त्या चिमुकल्यास दोष देता.
त्याच्या या यशापयशाचे कारण तुम्ही स्वतः असता
हे कस नाही कळत तुम्हा आत्ता
जीव आतुर झालाय माझा वीसावे शतक पाहण्यासाठी
कितीही हायटेक युग असले तरी ते नष्ट करण्यासाठी .
हो मी म्हणतो एक वाक्य पालकासाठी ।।३।।
शेजारच्या पोरग्याने पयला नंबर काढला
म्हणून रात्रभर तुम्ही त्याला ओरडता
पण त्याच्या अपयशामागे आपण जबाबदार आहोत,
हे कधी तुम्ही पाहता ?
त्याचे कौशल्य नाही शकत ओळखू तुम्ही
तर कसे दाखवू यश तुम्हास आम्ही
हो एक वाक्य पालकासाठी ।।४।।