एक उनाड दिवस
एक उनाड दिवस
1 min
425
कधी कधी उगवतो
एक उनाड दिवस
करावी खुप मस्ती
रहावे कसे बिनधास १
नाही काही कामधाम
ऑफिसला मारु बुट्टी
चला सगळे खेळाया
नाही तर माझी कट्टी २
आजच्या दिनी आपण
खुप उनाड पणा करु
कबड्डी खो खो खेळू
बिनधास्त गावात फिरू ३
एक दिवस वय विसरु
अगदी लहान छोटे होऊ
बोबडे बोबडे बोल काढु
पावसात भिजून जाऊ ४
यावा असा उनाड दिवस
चिंता सर्व विसरून जाऊ
आयुष्यात एका दिवशी
सर्व पाशातून मुक्त होऊ ५
