एक ओळ तुझ्यासाठी
एक ओळ तुझ्यासाठी
एक ओळ तुझ्यासाठी
माझ्या माऊली करता
जिणे संस्कार रुजवले
मम अंगी चांगल्या करता.
एक ओळ माझ्या देवासाठी
ज्याने घडवली सारी सृष्टी
निसर्ग रम्य ही कलाकृती
लोभस असावी आमची दृष्टी.
एक ओळ माझ्या संसारासाठी
कुटुंबासमवेत आनंदात घालवण्या
प्रेमळ आपुलकीने एकत्र सर्वांनी
मस्त गुण्या गोविंदाने राहण्या.
एक ओळ माझ्या मुलांसाठी
सदैव त्यांच्या सुख समाधानाला
न कधी येवो आपत्ती तया जीवनी
यश किर्ती लाभो त्यांच्या जिवनाला.
एक ओळ निसर्गा फक्त तुझ्यासाठी
जे तू देत आहे आम्हा सर्वांना पदोपदी
ऋण तुझे फेडणे म्हणजे सोदर्य तुझे
टिकवून ठेवणे आम्ही सर्वांनी सदोसदी.