एक मत
एक मत
1 min
205
माझ्या एका मताने
काय फरक पडेल
असे विचारुन सांगा
भारत कसा घडेल।।
अश्या या विचारानेच
घसरतो मतांचा टक्का
10 टक्के मते घेऊन
देतात जनतेला धक्का।।
आपल्या या मताचे
अवमूल्यन का करता
मतदानाच्या दिवशी
बाहेरची वाट का धरता।।
ज्यांचेकडे देशासाठी
मत दयायला नाही वेळ
त्यांचे जीवनात मताचा
होणार नाही का खेळ।।
आपल्या मताची ताकद
ओळखाल का आतातरी
आपल्या देशाचे भविष्य
का ठेवताय असे अधातंरी।।
आपल्या मताची किमंत
आपल्याच आहे हाती
वापराल तर सोने
अन्यथा आहे हाती माती।।
आपल्या मताची किमंत
चला आपणच करूया
सारेजण मतदान करून
लोकशाही मजबूत करूया।।
