ए माणसा.....
ए माणसा.....


ए माणसा, कधी माणसासारखं वागणार तू,
कधी सर्वांना माणूसकीच्या नात्याने समजून घेणार तू...
दुसऱ्यांची मने दुखावून तुला कसला मिळतो आनंद,
सर्वांना अपमानित करुन कशाचे मिळते तुला सुख...
स्वत:सारखेच दुसऱ्यालाही मन असते तू विसरलास,
माणूसकी या सुंदर शब्दाचा अर्थ पण तू विसरून गेलास...
दिखाऊपणा करत आतापर्यंत जगत आलास,
सर्वांशी गोड बोलून खोटा विश्वास निर्माण केलास..
खोटं वागून नक्की तुला मिळणार आहे तरी काय?
स्वतःलाच तू फसवत आहेस, तुला समजतंय काय???
लहान असो वा मोठा, सर्वांचा मान राखणं आहेच आपले कर्तव्य,मु
arent;">आपल्यामुळे कोणी दुखावणार नाही, यासाठी नेहमीच असावे सतर्क...
सर्वांशी आदराने वागले म्हणून बिघडत नसते काहीच,
प्रेमाने वागले म्हणून कोणाचे नुकसानही होत नाही काहीच...
कोणाला इतके पण कमी समजू नये रे माणसा,
कोण कधी उपयोगी पडेल ते येत नाही सांगता...
सगळ्याच गोष्टींचा राग राग करून घेण्यापेक्षा,
प्रेमाने समजावून सांगण्यात खरी असते रे मज्जा...
ए माणसा,
कधीतरी स्वतःशी प्रामाणिकपणे वाग तू,
खोटा दिखावा करण्यात आयुष्य व्यर्थ घालवू नको तू,
अजूनही वेळ गेली नाही स्वत:ला सावर तू ,
सर्वांसोबत आनंदाने आयुष्य जगायला प्रारंभ कर तू...