STORYMIRROR

Kranti Awale

Others

3  

Kranti Awale

Others

शब्दशृंगार

शब्दशृंगार

1 min
271

होय !!!

मी हरवलेय....

एका सुंदर अशा कवितांच्या जगात...


इथले रहिवासी आहेत फक्त सुंदर शब्द,

जे राहतात ओळींमध्ये अगदी थाटात मस्त....


या कवितेंच्या दुनियेत सुर्योदयही होतो शब्दांचे तेज लेवून,

आणि सांजेला हा शब्दसूर्य मावळतोही क्षितीजावर शब्दांचेच रंग सांडून...


इथला पाऊसही बरसतोय शब्दांमधूनच,

आणि या शब्दसरींचे सुमोहक मोती बनतात ते या महाराष्ट्राचा मातीतूनच...


इथली कळीसुद्धा उमलतीये, फुलतीये शब्दगंधातून,

आणि त्याच सुंदर सुगंधाने सारा आसमंतात गेलाय दरवळून...


इथे दुःखालाही मिळते किनार शब्दांचीच माळ ओवून,

आणि येथे मनमुरादपणे आनंद साजरा होतो शब्द तोरण बांधून...


 इथे प्रत्येक व्यक्त-अव्यक्त भावनेला वाट मिळते ती या शब्दांतून,

आणि अधीर झालेल्या मनालाही सावरायला साथ लाभते ती या मोत्यासारख्या शब्दांतूनच...


असे हे कवितेचे जग खरंच आहेच खूप मस्त,

म्हणूनच या जादूई जगात माझं मन रमलेय जास्त....


Rate this content
Log in