ओढ पाऊसाची
ओढ पाऊसाची
1 min
375
परमेश्वराने निर्माण केलेली सुंदर रचना म्हणजे पाऊस...
याच पाऊसाची ओढ असते पृथ्वीवरील सर्व जीवांना,
पाऊसालाही मन भरुन भेटायचे असते पृथ्वी मातेला...
पहिल्या पाऊसाचा अनुभव असतो खूप अविस्मरणीय आणि रोमांचकारी,
याच सुंदर अविस्मरणीय क्षणांनी जीवनाला फुटते नवी पालवी...
पाऊसामुळे सगळे जीव सुखावून जातात एका क्षणात,
सुंदर निसर्गही आनंदाने हसू लागतो गालातल्या गालात...
श्रावणातला पाऊस म्हणजे लपाछपीचा खेळच जणू,
ऊन सावल्यांचा खेळामध्ये इंद्रधनुष्य डोकावते हळूच...
नेहमी हवाहवासा वाटणारा, मनाला अलगद स्पर्शून जाणारा,
हा सुंदर पाऊस थोड्याकाळासाठी पृथ्वीवर येतो,
आणि सर्वांची मने अगदी सहज जिंकून जातो.
