रक्षाबंधन
रक्षाबंधन

1 min

100
काही नाती खरंच खूप अनमोल असतात,
त्यातलंच सगळ्यात अनमोल नातं म्हणजे बहिण-भावाचं...
दोन मनांचं अतूट आहे हे प्रेमाचे बंधन,
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलणार आहे स्पंदन...
राखी म्हणजे प्रेमाचे आपुलकीचे विश्वासाचे प्रतीक,
या धाग्यामुळे जोडले जाते दोन हळव्या मनांचे गुपित...
कितीही भांडणं झाली तरी एकमेकांशिवाय करमत नसते कधी,
म्हणूनच जगामध्ये हे नाते आहे सर्वात खूप भारी...
रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणासाठी दिलेला शब्द,
याच सणामुळे बहिण-भावाचे नाते होते आणखीण घट्ट...