STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Others

4  

Sangam Pipe Line Wala

Others

दुरावा मंजूर आहे

दुरावा मंजूर आहे

1 min
483

साजणी मी प्रेमात मजबूर आहे 

जा तू मला तुझा दुरावा मंजूर आहे.....


लिहतो मी रोज तुझ्यावर किती गीतं 

डोळ्यात आहेत अश्रू शब्दात तुझे मीतं

माझ्या जिवाला लागली तुझी हूरहूर आहे......


सहन कसा करू तुझा हा वेडा रुबाब 

पुस्तकांत ठेवलेला आज रडतो गुलाब 

प्रेमात पाहिलेलं स्वप्नं डोळ्यापुढे चूर आहे......


मला वाटे मी जगात तुझ्या साठीच आलो 

विसरलो जग मी तुझ्या आठवणींत मेलो 

माझ्यापेक्षा जास्त राणी तुझं प्रेम चतुर आहे.....


तुझ्यामुळे लोक आज ठेवतात संगमला नावं 

किती प्रेमळ होत आज बईमान झालं तुझं गावं

जीवनात आणला माझ्या नुसता दग्याचा धूर आहे......


साहित्याला गुण द्या
लॉग इन