STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

4  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

दरिद्री

दरिद्री

1 min
340

गरिबीने नाही, लाचारीने नाही

धन-धान्यांच्या कमतरतेने नाही

माणूस असून जेव्हा, जनावरासारखे वागता

तेव्हा तुम्ही दरिद्री असता


नशिबाने नाही तर कर्माने

लढण्या अाधीच हारण्याने

दोष दुसऱ्यांना जेव्हा तुम्ही देता

तेव्हा तुम्ही दरिद्री असता


जमीन, बंगला, गाडी दारी

उंच आकाशात मारता भरारी

आप्पलपोटी जेव्हा तुम्ही होता

तेव्हा तुम्ही दरिद्री असता


मान सन्मान मिळवता स्वतःसाठी

जिवलगांच्या टाळून भेटी

आपल्याच लोकांना जेव्हा पाण्यात बघता

तेव्हा तुम्ही दरिद्री असता


श्रीमंतीचा जेव्हा चढतो माज

वाटते माझ्याशिवाय नाही कोणी आज

भिंत घरातच जेव्हा तुम्ही बांधता

तेव्हा तुम्ही दरिद्री असता


पेरण्याअाधीच कुजण्याची भिती

जळण्याअाधीच विझण्याची भिती

परके जेव्हा तुम्ही स्वतःशीच होता

तेव्हा तुम्ही दरिद्री असता


तुम्ही मिळवता सर्व काही

पण आपल्यांसाठी काहीच नाही

मोठ्या मोठ्या जेव्हा तुम्ही बाता मारता

तेव्हा तुम्ही दरिद्री असता


तुमच नाव, तुमचा लौकीक

त्याच तुम्हालाच कौतिक

जेव्हा तुम्ही समाजाचे नसता

तेव्हा तुम्ही दरिद्री असता


धुंदी चढते काम वासनेची

काढतात धिंदोडे दुसऱ्याच्या अब्रुची

फाटक्या साडीत जेव्हा तुमच्या नजरा रूततात

तेव्हा तुम्ही दरिद्री असता


पैसा, संपत्ती कमवली खूप

मंदिरात जाळली अगरबत्ती, धुप

धर्म मानवतेचा जेव्हा विसरता

तेव्हा तुम्ही दरिद्री असता


Rate this content
Log in