STORYMIRROR

Prachi Deshpande

Others

4  

Prachi Deshpande

Others

दिवाळी

दिवाळी

1 min
393

उत्साहपूर्ण दिवाळी पहाट,

आणि दृष्ट काढावी असा निसर्गाचा थाट!

सुखमय होऊ दे आयुष्याची पाऊलवाट ,

घरोघरी वाहू दे आनंदाची लाट!


तसे नेहमीच प्रत्येकाच्या घरी शुभ्र प्रकाशाचे दिवे ,

उजेड मात्र चार भिंतीतच राहे !

पण उंबरठ्याबाहेर प्रकाश आणेल तो हा सण ,

तेजस्वी पणती , प्रफुल्लित करी मन !


दोन तळहातांची ओंजळ पण एक पणती ,

त्यातून सत्कर्माची वात कायम जळती !

अशा पणतीच्या प्रकाशात अंधारलेली वाट होऊ दे मोकळी,

तेव्हा होई सार्थकी ही दिवाळी !


Rate this content
Log in