दिन सुगीचे
दिन सुगीचे
1 min
396
दिन शिवार सोहळा
सर्जाही मस्त नटला
आले दिवस सुगीचे
शेतकरी आनंदला
राब राब तो राबला
दिन रात्र जोपासले
कष्ट केले शिवारात
धान्य पीक उभारले
संगे ढवळ्या पवळ्या
कृपा झाली वरुणाची
धान्य आले बहरुनी
पुर्ती झाली ती स्वप्नाची
कर्जफेड ती होईल
आनंदला मनातुनी
घास सुखाचे मिळेल
पोरा शिक्षा शाळेतुनी
सुगी येता शिवारात
घर भरे आनंदाने
पोराबाळा भार्येसह
आनंदला तो सौख्याने
पीक कापणी मळणी
जुंपतील कामा बाया
पोती भरे वावडुनी
बाजाराला जाती गाड्या
दाम कष्टाचा मिळेल
चिंता नसेल वर्षाचे
आत्महत्या नसे चिंता
दिन येईल हर्षाचे
