दीप चैतन्याचा
दीप चैतन्याचा

1 min

99
कोमेजले मन
झाकोळले स्वप्न
दावुनी आधाराची वाट
दीप लावू चैतन्याचा.
होते जीवांची आबाळ
खाण्यानसे भाकर
देऊनी मदतीचा हात
दीप लावू चैतन्याचा.
लढणारे सर्व हात
न थांबती कदापी
भाव अर्पून कृतज्ञतेचा
दीप लावू चैतन्याचा.
एकठायी बसण्याची
कला नसे अवगत
आदर करूनी संयमाचा
दीप लावू चैतन्याचा.
बदल घडवुनी स्वत:मध्ये
धरली तंत्रज्ञानाची कास
वंदन करूनी गुरूजनांस
दीप लावू चैतन्याचा.
एक शब्द आपुलकीचा
देई मनास उभारी
माणुसकीचे भान ठेवूनी
दीप लावू चैतन्याचा.
रोगाचे करण्या उच्चाटन
अंगात देई रे बळ
प्रार्थना करूनी प्रभूस
दीप लावू चैतन्याचा.