STORYMIRROR

Neha and Saanvi Bhave

Others

3  

Neha and Saanvi Bhave

Others

कोकण भूमी माझं गाव

कोकण भूमी माझं गाव

1 min
179

नागमोडी वळणावर, साज कौलारू घरांचा 

डोंगर रागांच्या कुशीत, थाट माझ्या गावाचा.

मनाला माझ्या खुणावतो, अथांग सागर किनारा, 

पांढरी शाल पांघरून, लाटांमध्येच रमणारा..

माझ्या ग परसात, वाऱ्यासंगे डोलती उंच माड, 

त्यात दिमाखाने उभे, एक मोठे फणसाचे झाड..

काजूच्या बागा, बांबूची वने, आंब्याची राई,

पसरली झाडावर रत्नांची दुलई..

करवंद, जांभूळ, तोरणे, रानमेव्याची लयलूट, 

निसर्गाच्या अनमोल ठेव्याची, मेजवानी भरपेट ..

माझ्या ग अंगणात ,फळाफुलांचा बहर 

हिरव्यागार शेतामध्ये, अत्तर सांडतो आंबेमोहोर ..

माझ्या गावची जत्रा, मंदिरातल्या सजावटीची, 

अगरबत्ती, फुलांनी सजलेल्या, गाभारातल्या देवदेवतांची. 

माझ्या गावची माणसे, फणसासारखी गोड, 

त्यांच्या अवीट प्रेमाला नाही कशाचीच तोड. 

माझ्या ग गावची काय वर्णू मी महती 

दूर जाता गावासाठी पायही रेंगाळती. 

कोकण पुण्यनगरीत, गाव ग माझा न्यारा, 

मज अभिमान त्याचा बहू असे. 


Rate this content
Log in