पाऊस पहिला वहिला
पाऊस पहिला वहिला

1 min

48
पाऊस मृगाचा पहिला, दाटुन नभी आला
अलवार वारयासंगे, सर सुखाची घेऊन आला
पाऊस पहिला वहिला मनास मोहून गेला.
धरतीला आलिंगन द्याया, अधीर तो झाला,
गंधीत आोल्या मातीला, आसमंती दरवळुन गेला,
पाऊस पहिला वहिला मनास मोहून गेला.
बेधुंद पाऊस धारा, संगे रिमझिम सरींची शृंखला,
चराचर सृष्टीने ल्याली, नवचैतन्याची मेखला,
पाऊस पहिला वहिला मनास मोहून गेला.
धरती रानोमाळी सजली, नेसुनी हिरवाकंच शेला,
रंगीबेरंगी फुलांच्या, घालुनी गळ्यात माळा,
पाऊस पहिला वहिला मनास मोहून गेला.
ऊन पाऊस, श्रावणसरींचा खेळ सुरू झाला,
सणवार, व्रतवैकल्यांचा, मनी उत्साह उधाणला,
पाऊस पहिला वहिला मनास मोहून गेला