झोपाळा
झोपाळा
1 min
44
या झोपाळ्याने मायेचे अंगाई गीत आकारले,
आई, बाबा बोबडे बोल तुझ्यासोबत साकारले
या झोपाळ्यावर झुलताना बालपण गेले सरूनी,
खेळ गंमती-जंमतींचा भरून घ्याव्या आठवणी
हा झोपाळा झुलतो पुढे नी मागे,
सुख, दुःखाची, मन बुद्धीची जोड असेही सांगे
हा झोपाळा, हा हिंदोळा उंच आकाशी झुलतो,
मधुर स्वप्नांचा मनी मोगरा फुलतो
मन आपुले झोपाळ्यासंगे इथे तिथे बागडे,
या झोपाळी झुलताना द्विधा मनाची खुण उलगडे
जरा विसावा या हिंदोळ्यावर, जणू आनंदाचा सोहळा,
या झोपाळी झुलताना मज दिसे कृष्ण सावळा