STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

3  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

धुर चितेचा

धुर चितेचा

1 min
145

झालो धूर मी चितेचा,

जीवनाची रात्र झाली.

माझ्याच मैफिलीत

माझ्याच ग्लास खाली.

केला किती प्रयास तरीही सुटले नाही.

हे कोडे सोडवाया

माझी हयात गेली.

माझ्याच मैफिलीत

माझाच ग्लास खाली.

फिरलो उगाच येथे

घर माझे शोधायला.

माझ्याच माणसांनी माझीच फसगत केली.

माझ्याच मैफिलीत

माझाच ग्लास खाली.

किती विचारून पाहिले

किती समजुत काढली.

माझ्या मारेक-यांना माझी दया ना आली.

माझ्याच मैफिलीत

माझाच ग्लास खाली.

माझे शब्द नाही कळले

माझा भाव नाही कळला

समजावया ह्या जगाला

मी शर्त सारी केली.

माझ्याच मैफिलीत

माझाच ग्लास खाली.

मी रात्र जागलो सारी

आशेवर उद्याच्या

माझ्या आयुष्याची

नाही पहाट झाली

माझ्याच मैफिलीत

माझाच ग्लास खाली.

नाही झाल्या दोन एक येथे जखमा अनेक

माझ्या विरुद्ध येथे सर्वानी साक्ष दिली

माझ्याच मैफिलीत

माझाच ग्लास खाली

काही अपेक्षा नाही आणि दोन्ही हात खाली

आता देहाची ही दौलत

कफनाच्या हवाली केली

माझ्याच मैफिलीत

माझाच ग्लास खाली


Rate this content
Log in