Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

धम्मकलाडू

धम्मकलाडू

1 min
193


सोनू, मोनू, टिना शाळेत निघाले

रस्त्यावरुन जाताना हळू चालले

वाटेत दगडाबरोबर खेळत निघाले

शाळेच्या वेळेत नाही पोहोचले....


शाळेची घंटा टण टण वाजली

मुलांनी ती रस्त्यातच ऐकली

मग काय मुले जोरातच धावली

प्रार्थना चुकणार म्हणून ती घाबरली....


पोहोचले एकदाचे तिघेही शाळेत

सर्व मुले, शिक्षक दंग होते परिपाठात 

शाळेचे गेट तर झाले होते बंद

तीन मुले पडली आता विचारात...


मुख्याध्यापक यांनी मुलांना पाहिले

शाळेचे गेट शिपायाला उघडायला लावले

मान खाली घालून मुले उभी राहिली

त्यांना शिक्षा म्हणून पळायला सांगितले...


परिपाठ झाला, मुले वर्गात गेली

शिक्षा घेऊन मुले वर्गात जाऊन बसली

वर्गशिक्षकांनी मुलांना उशिर झाला तर

धम्मकलाडू देऊन कानउघडणी केली...


Rate this content
Log in