धागा विश्वासाचा
धागा विश्वासाचा
धागा विश्वासाचा अतूट असला
तर बंध प्रेमाचे ही अतूट असतात
तरूण तरुणी प्रेम विवाह करती
एकमेकांच्या विश्वासावरच ती टिकतात.
पहिलं पाऊल टाकणारं मुल चालू लागतं
आई आपल्याला सावरणार ह्या विश्वासावर
परिक्षेला बिनधास्त जाऊन बसतो फक्त
आपला विश्वास असतो आपल्या अभ्यासावर.
विश्वास प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीत हवा असतो
त्या धाग्यावरच आपण यश गाठत असतो
स्वतःवरच्या विश्वासाने नोकरीची मुलाखत
मस्त होऊन नोकरी हमखास मिळवत असतो.
नाती गोती संसारात टीकत असतात
फक्त एकमेकांत असलेल्या विश्वासावरच
हा धागा विश्वासाचा जपावा प्रत्येकाने केवळ
सुख, समाधान, बंध रेशमाचे अतूट ठेवण्यावरच.
प्रेम, माया, शब्द, गोडवा सारे धागे विश्वासाचे
फुलांची माळ बनवता धागा मजबूतच हवा
तसेच बंध रेशमाचे गुंतण्या धागा विश्वासाचा
प्रत्येकाने सगळीकडे टिकवून ठेवायला हवा
