STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

3  

Sanjana Kamat

Others

देवी एकवीरा (षडाक्षरी)

देवी एकवीरा (षडाक्षरी)

1 min
224

ध्यास मनी लागे

तिच्या दर्शनाचा

भाळी मळवट

शोभे कुंकवाचा 


हृदयी भावपुष्प

दाटे गहिवर

इच्छापूर्ती मूर्ती

ख्याती जगभर


देवी एकवीरा

देई श्रध्दा भक्ती

सर्वकाळ रक्षी

आत्मबल शक्ती


किमया देवीची

नऊ रूपे घेई

दावे भक्तीमार्ग

दिसे ठाई ठाई


हर्ष दाटे मनी

लाभे सुख शांती

टाक बदलून

दुष्टांची कुनीती


शुद्ध आचरण

तेवे ज्ञानज्योत

दिव्य प्रकाशात

सृष्टी ओतप्रोत


साहित्याला गुण द्या
लॉग इन