देवा सरू दे माझे मी पण
देवा सरू दे माझे मी पण
1 min
666
देवा सरू दे माझे मी पण
देव जर मला भेटला
सांग तव इच्छा म्हणाला
आधी मागीन मी तयाला
संपव माझ्यातील मी पणाला
षड्रीपूंचे जग हे भरलेले
दूर तया सारण्या दे शक्ती
तूच भर भाव मम हृदयी
मी पण सारण्या घडो भक्ती
विसर न व्हावा कधी तुझा
घडू दे निरंतर तव सेवा
सरू दे माझे मी पण
द्यावा हाची कृपेचा ठेवा
वृक्षलता करती उपकार
तशीच घडो सेवा हातूनी
न दाविता अहम् भाव
सरू दे मी पण मनातूनी
हेची दान दे देवा आता
आले मी तुला शरण नाथा
सरू दे देवा माझे मी पण
टेकविते तव चरणी माथा
