देव भेटेल
देव भेटेल
1 min
65
जन्म दिधला देवाने
देह करी कर्मे सारी
वसतो तोची देहात
सदा कर्मे करावी न्यारी
देव वसतो कर्मात
सदा घडावे सत्कर्म
देव भेटे कर्मातुनी
हेची जीवनाचे मर्म
देता भुकेल्यास अन्न
उठविता पतितास
हसे तो निर्मळ भावे
बघतो आपणास
दडलेले दुधात लोणी
जरी नाही दिसत सहज
तसाच देव वसे देहात
सांगण्याची नसे गरज
नका शोधू तया देवा -ही
असे तो चराचरात
पहा हसऱ्या फुलात
आपल्याच नित्य कर्मात
