ढगांची गडबड
ढगांची गडबड
1 min
162
ढगांची गडबळ
पावसाची सळसळ
वादळवाऱ्यासोबत
माणसांची धावपळ
झाडांचं डोलणं
कळीचं फुलणं
दवबिंदूच्या स्पर्शाने
लतिकाचं लाजणं
पाखरांची पळपळ
झऱ्याची खळखळ
डोंगराच्या शिखरावर
वसुंधरेची हिरवळ
पावसाची सर
हवेची लहर
मैनेच्या सुरात
फुलांचा बहर
शेतात नांगरणं
बिजांचं पेरणं
डोलणारं कणीस पाहून
गालावर हसू फुलणं
