दैवत
दैवत
आईबाप हे दैवत असतं
नशीबाने ते मिळत असतं
ऋण त्यांचे फेडणे अशक्य
तरी जाण त्याची ठेवणे हे
मुलांचे मात्र कर्तव्यच असतं
काबाड कष्ट हाल अपेष्टा व
आपलं सर्वस्व देऊन ते
मुलांच भवितव्य घडवतात
उच्च शिक्षण या उच्च पदा साठी
जाई पोरगं परदेशात
रमून जाई तेथील वातावरणात
थांग पत्ता लागू न देई, तेथे
लग्न जमवून स्थाहीत होई
वाटेवरती डोळे लावून राही
आज ना उद्या येईल बाळ घरी
अहंम और स्वार्था पाई
पोरगं साफ बिघडून जाई
ये रे बाळा ये एकदा तरी ये
माय आसू ढाळत राही घरी
स्मुती भ्रंम झाला तरी
माय न विसरे बाळा
मरण शयेवर वाट पाहे माऊली
पण बेधुंद जगण्याने बाळ जाई
विसरुन मायच्या ममतेला ही
नको होऊ असा निर्दयी बाळा
हो आधार तू तुझ्या आई बाबांचा
