चिंब
चिंब
1 min
27.7K
बाहेर बरसत्या पावसा सारखे
चिंब भिजवते प्रेम मज आज
तू अशी जवळी बिलगते
जणु ओघळता पाऊस थेंब
गार शहारा बाहेर
पेटतो निखारा आत
उन्मुक्त उस्फुर्त तो
चुंबनालिंगन तुझे
बहारदार कोसळतो तो
श्र्वास आवेग तुझा
बहरुन येई प्रित अशी
सर पावसाची जशी
मेघ ऊतरुनी पसरती
मलमली विळखा सुगंधी
पाऊस नाद गुंतवी
मुग्ध होतो प्रणयी
.... चिंब रसिक
