प्रशांत पवार

Romance

3.5  

प्रशांत पवार

Romance

चिंब पावसात

चिंब पावसात

1 min
163


ती म्हणाली बघ बाहेर

किती मस्त पाऊस कोसळतोय

मला ही आज त्याच्या सोबत

चिंब भिजावं वाटतंय

तू येतोस सोबत पावसात

आज तुझ्यासोबत चिंब भिजावं वाटतेय

तुझा माझा पहिला पाऊस

तुझ्यासोबत झेलावं वाटतेय

पावसाचा थेंब झेलताना

तो तुझ्या गालावरून ओळघळत यावा

अन मला भिजवावा

तुझ्या ओल्या देहावर

तो मला ओढून घ्यावा

घट्ट बिलगावं

तुला त्या चिंब पावसात

तुझं माझं नातं फुलावं

या ओल्या चिंब दिवसात


Rate this content
Log in