चारोळ्या
चारोळ्या
1 min
503
१) अरण्यात जंगलचा राज
सिंह झोपला होता शांत
दचकून उठला बिचारा
मूषकाच्या त्या खेळात.
२) सिंहाने धरली बकोटी
घाबरगुंडी उडाली उंदराची
विनवणीने सुटका झाली
भरपाई करीन उपकारांची.
३) आला काळ रुपी शिकारी
सिंहाला जाळ्यात पकडला
डरकाळीने मूषक आला
जाळे कुरतडून सिंहाला सोडला
४) लहान थोर मोठा छोटा
नसतं असं कोणी जगात
उपकारांची जाण ठेवुनी
धन्यता माना ती फेडण्यात
