बलिदान
बलिदान
1 min
202
पाठी खुपोनी खंजीर
केला गनीमाने घात
जाळून टाका जंजिरे
पेटुनी शौर्याची वात ||१||
शपथ घेई ध्येयाची
काळाने घातली साद
वेळ भरली शत्रूंची
करुनी शंखाचा नाद ||२||
खूप ऐकून घेतले
भ्याडपणाचे हे सल्ले
आपल्या शूरविरांनी
परतूनी केले हल्ले ||३||
कर्तव्य बजावण्याची
आली ही आपली बारी
जाणू शर्त प्रयत्नांचे
एकवटू शक्ती सारी ||४||