भावगीत
भावगीत
1 min
458
ईशनाम स्मरणात मी दंगले
ध्यान ईश नामात माझे गुंगले....।।ध्रु।।
हृदयात स्पंदन झाले देवाचे
भाव भक्ती द्वार उघडे मनाचे
प्रेम भावात सारे लोकं गुंतले
ध्यान ईश नामात माझे गुंगले....।।१।।
पांडुरंग विठू गं माझा सावळा
दीनाच्या घरी मदतीला धावला
विठू भक्त भेटी एकांती बसले
ध्यान ईश नामात माझे गुंगले...।। २।।
दर्शन दे रे पांडुरंगा मजला
माझी आस नाही कळली तुजला
तुझ्या भक्तीत देवा आता दंगले
ध्यान ईश नामात माझे गुंगले..।।३।।
