भारतीय संस्कृती
भारतीय संस्कृती
भारतीय संस्कृती आपुली
आहे अति पुरातन
रुढी अन् परंपरेची सदैव
करतोय आपण जतन
सारे मानव आहेत बांधव
माणुसकीची देत शिकवण
मानवता हाची धर्म ,अशा
उदात्त भावांची तियात साठवण
साजरे करिते सणवार उत्सव
दाविते तयातून रूढी परंपरा
उत्सवातून दिसे समाजप्रेम
समतेची ध्वजा हाती धरा
किती वर्णावी संस्कृती ची गाथा
येथेच जन्मले संत, वीर महान
अन् अंतराळात जाणारे शास्त्रज्ञ
काय सांगावी संस्कृतीची शान
अशी महान संस्कृती भारतीय
असावा मनी सदा अभिमान
साहित्य , कला, क्रिडा ,संगीतात
एक एक चमकते तारे महान
