भान हरवले माझे....
भान हरवले माझे....
1 min
254
भान हरवले माझे
बघुनिया तुझे रूप ।
आईशप्पथ सांगतो सखे
आवडतेस मज तू गं खूप ।।
दिसशी तू दाही दिशा
चढली कशी गं ही नशा? ।
वेड लागले तुझ्या प्रेमाचे
झाली बघ कशी ही दशा ।।
अथांग सागराहुनी सखे
प्रेम अंतरी तुझ्यासाठी ।
ठेवशील का थोडीशी जागा
हृदयामध्ये माझ्यासाठी? ।।
शिकलो लिहण्यास कवने
तुझ्याच गं प्रेमामुळे ।
जीवन सुंदर वाटे मज
तुझ्याच गं असण्यामुळे ।।
शुद्ध अंतःकरणाने मी
प्रेम करतो तुजवर ।
स्वीकारूनी प्रेमाला माझ्या
उपकार कर गं मजवर ।।
