STORYMIRROR

SATISH KAMBLE

Others

4  

SATISH KAMBLE

Others

बेईमानी कर्तव्याशी

बेईमानी कर्तव्याशी

1 min
703

काम कमी याचे अन्

दिखावाच झालाय जास्त,

कुणाचंच याला नाही पडलं

हा आपल्याच धुंदीत मस्त


धूर्त कोल्हा, शातिर बगळा

नौटंकीचा कळस गाठला,

काय काय देऊ उपमा याला

समजत नाही माझ्या मनाला


लावा लावी, भेदा भेदी

याला फक्त जमते आहे,

आकांडतांडव करूनी स्वतःच्या

चुकांवर पांघरूण घालतो आहे


नौटंकीमध्ये भल्याभल्यांचा

रेकाॅर्ड याने तोडला आहे,

खोटे बोलूनी वेळोवेळी

नामानिराळा झाला आहे


वृत्ती याची अति घातकी

कपट नेहमी याच्या मनात,

सर्वांच्याच हळूहळू हे

येत आहे चांगले ध्यानात


कर्तव्याची जाण न याला

बेईमान आपल्या कामाशी,

हेराफेरी करूनी बघा ना

राहतो हा तर सदैव तुपाशी


कष्टकर्‍यांचे करूनी हाल

करतो हा त्यांचे नुकसान,

खोटे नाटे पटवून देऊन

वरिष्ठांचे भटकवतो ध्यान


अशा व्यक्तीच्या हातून सांगा

कारभार कसा होईल सुरळीत,

ज्या थाळीमध्ये हा खातो

छेद हाच करतो त्या थाळीत


त्वरीत अशा व्यक्तीच्या हातून

अधिकार हे काढूनी घ्यावे,

प्रामाणिक त्या कष्टकर्‍यांसह

संस्थेलाही तारूनी न्यावे...!!!


Rate this content
Log in