बदलली माणसे
बदलली माणसे
बदलली माणसे
किती छान होता तो काळ
माणसं एकमेकांना जपत होती
अख्खा गावच वाटायचं एक घर
किती एकोपा आपुलकी होती.
आता काळा बरोबर माणसं ही बदलली
एकुण ऐक आता सगळी स्वार्थी बनली
जो वरी पैसा तो वरी बैसा असा कायदा
अन् तो मिळवण्यास काही करू लागली.
संस्कारांचं देणं घेणं कुठेच आढळत नाही
मान मर्यादा आचार विचार सगळं बदललं
एकत्र कुटुंब पध्द्ती आता गेली रसातळाला
आणि विभक्त राहणंच सर्वांच्या पसंतीने ठरलं.
प्रेम, माया, ममता, एकोपा, आपुलकी, विश्वास
कुठल्या कुठे गायब झाले कळुन नाही राहिले
आता माणुसकी खूपच विरळ झालीयं
पुर्वी सारखे नाते सबंध ही घट्ट नाही राहिले.
काय म्हणावे ह्या आजच्या संसाराला
विलायती प्रभाव की अहंचा अधिकार
काही झाले तरी माणसं माणसांना दुरावली
आता ती बदलली आणि बदलत राहणार.
