STORYMIRROR

Mangesh Medhi

Others

1  

Mangesh Medhi

Others

बदल

बदल

1 min
3.1K


काळ बदलतोय

तशा चालीरितीही

गमावतोय

मन समाधान

हवे हवे

अजून थोडे

अजून थोडे


मिळतंच नाही

मिळालेच नाही

असं नाही

सारे उपभोगले

सुख दु:ख

प्रापंचिक, ऐहिक

तरीही, संधीकाली

मांडतोय

नवा प्रपंच


शोधतोय

नवा जोडीदार

काळ बदलतोय

तशा चालीरितीही

खरंतर

वाढतोय

भोग, हव्यास !


अन् मिळतच नाही

ज्यास तो

भागवतो, तसेच

विनातक्रार

ओढाताण

नित्याचीच


समाधानी तरीही

दिसतो आनंदी

काळ बदलतोय

तशा चालीरितीही

खरंतर

वाढतोय

विरोधाभास


Rate this content
Log in