औकाद माझी
औकाद माझी
1 min
486
औकाद माझी ती आज कळते मला ही
फास होऊन गळ्यास चळते मला ही
तू आज सोडले मला अन गाठ सुटली
सुटल्यावर विनाकारण वगळते मला ही
लाख प्रश्न असतात मेंदूत माझ्या सलणारे
सलतांना विचार गर्तेत ढवळते मला ही
तू होतीस अशी की तो देव पळून गेला
पाहून सारे जगात का मिसळते मला ही
सापडत असतो नेहमीच मी fb वर तिला
न शोधता का स्वप्नांत कवळते मला ही
आज पाहिलं मी पण आठवून तिला
का सरणावर आज ती उजळते मला ही
शेवटचं भेटशील मला आशा होती माझी
कळले नंतर राख घेऊन उधळते मला ही
