अंधश्रद्धेचा अंधार
अंधश्रद्धेचा अंधार
1 min
269
कुष्ठरोगाची बाधा झाली
झाले जीवन लाजीरवाणे
भितीमुळे जनांच्या
माझ्या नशिबी आले
कुढत कुढत जगणे
जिव्हारी लागल्या नजरा
लोकांचे आपसात कुजबुजणे
पाप शाप रे यास लागले
पूर्वजन्मीचे भोगणे
देवूनी आरोग्य शिक्षण यांना
करा जरा शहाणे
अंधश्रद्धेचा अंधार जाता
जीवन होई शरदाचे चांदणे
