अनामिका
अनामिका
1 min
154
माझ्या स्वप्नात येतोस
मस्त गाली हसतोस
गालावरील खळी पाहुनी
मला का रे खुणावतोस...
नयनी माझ्या पाहतोस
मनीचे सारे ओळखतोस
अनामिका मी तुझ्या ओढीची
हे रहस्य कसे काय जाणतोस...
जागेपणीच्या आठवणीत
मग तनुस मस्त शहारा येतो
जाग्या होतात स्मुर्ती साऱ्या
धुंद प्रणयात तू घेऊन जातो..
धुंद, बेधुंद मन होत जाते
बहाणे सारे समजतात तुझे
जवळी तू असावा वाटते सदा
मन भरतच नाही कसे माझे...