अक्षय तृतीयेचा सण
अक्षय तृतीयेचा सण
आला आज
अक्षय तृतीयेचा सण
आनंदी मन
ठेवा...!
करावे दान
अक्षय तृतीयेच्या दिवशी
संकटे जाशी
पळून...!
करावे दान
कपडे,वस्तू,दागिने
दु:ख जाणे
इतरांचे...!
विघ्न सारे
निघून दूर जातील
सुख येईल
घरा...!
पितृजनांची आठवण
घालावे जेवू गरीबांना
सुख इतरांना
द्यावे...!
करावे सारे
कार्य स्वतःच्या सुखासाठी
चिंतावे दुस-यासाठी
काही....!
स्वतःबरोबरच इतरांचे
भले होऊ दे
सुख दे
सर्वांना...!
दिवस खास
सण अक्षय तृतीयेचा
सर्वांना आनंदाचा
राहो...!